विशेष प्रतिनिधी
सोलापूर : महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना जाणता राजा म्हणून डोक्यावर घेतले होते, त्यांनी कायमच दुष्काळी भागाला पाणी देणे खर्चाच्या दृष्टीने व्यवहार्य नसल्याचे म्हटले होते. पण नुसत्या तुताऱ्या फुंकून दुष्काळी भागाला पाणी देता येत नाही. त्यासाठी काम करावे लागते. ते काम देवेंद्र फडणवीस यांचे सरकार करत आहे, अशा तिखट शब्दांचा प्रहार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर केला.RadhaKrishna vikhe patil targets Sharad Pawar
बाळासाहेब ठाकरे उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन विखे पाटलांच्या हस्ते सांगोल्यात झाले. या कार्यक्रमाला मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते, माजी आमदार शहाजी बापू पाटील आदी नेते उपस्थित होते. या सगळ्यांच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर थेट प्रहार केला.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले :
महाराष्ट्र ज्यांना जाणता राजा म्हणत होता, त्यांनी कायम दुष्काळी भागाला पाणी देणे खर्चात बसत नसल्याची उत्तरे दिली होती. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ मुक्तीसाठी काम करत आहेत. नुसत्या तुताऱ्या फुंकून काही होत नसते.
सध्या राज्यात जवळपास दोन लाख कोटींचे सिंचन प्रकल्प आणि नदीजोड प्रकल्पाची कामे सुरू आहेत. पुढील पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचे स्वप्न आम्ही पाहत आहोत.
संजय राऊत हे मनोरुग्ण आहेत. त्यांची जागा मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे. आता त्यांच्या नेत्यांनीच ते पाहावे अन्यथा जनता त्यांना जागा दाखवेल. महायुतीने मिळविलेला विराट विजय पचनी पडला नाही म्हणून ते बडबडत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App