विशेष प्रतिनिधी
नाशिक : ”भाजप- शिवसेनेच्या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन कोल्हे मजा बघत आहेत’’, असा जोरदार टोला रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला. Quarrel between Bjp- Shivsena And Two Foxes Taking fun of It: Sadabhau khot alleges on congress and Rashtrawadi congress
राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप, असे चित्र आहे. यावरुन सदाभाऊ खोत यांनी जोरदार टोलेबाजी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेची कारवाई आणि जामीन यावरुन चार दिवसांपासून जोरदार राजकारण सुरु आहे.
‘सेना- भाजपच्या भांडणात दोन कोल्ह्यांची मजा’, सदाभाऊ खोत यांची काँग्रेस, राष्ट्रवादीवर कडाडून टीका
भांडणात दोन कोल्हे स्वत:चे हित साधत आहे. भाजप-सेना एकत्र येऊ नयेत, यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेसचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोपही केला. शरद पवार यांनी तर एकदा बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याची तयारी केली होती. तसेच अनिल परब यांसारख्या बुद्धिजिवी माणसाने राणेबाबत असे करणं योग्य नाही. महाराष्ट्रात यापूर्वी अनेक वक्तव्य केली गेली. मात्र, कधी दंगल झाली नाही. सरकार पुरस्कृत गोंधळ घातला गेला. राज्यातील जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून वेगळे प्रश्न तयार करण्याची ही सुरुवात आहे. ही एकप्रकारची खेळी आहे.
शिवसेना – भाजपच्या वादामुळे विरोधकांना उकळ्या
भांडणात काँग्रेस, राष्ट्रवादीचे हे कोल्हे मजा पाहतात
भाजप-शिवसेना एकत्र येऊ नयेत, राष्ट्रवादीचा प्रयत्न
बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेची केली होती तयारी
जनतेचे प्रश्न बाजूला ठेवण्यासाठी सरकारचे प्रयत्न
वेगळे प्रश्न तयार करण्याची ही सुरुवात
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App