विशेष प्रतिनिधी
पुणे :जागेच्या प्रश्नावरून कायम चर्चेत असलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेची मान्यता केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने रद्द केली आहे.तत्कालीन फडणवीस सरकारला मान्यता मिळाली होती मात्र महाविकास आघाडी सरकारने जागेत बदल केल्याने ही परवानगी नाकारण्यात आली आहे.PURANDAR AIRPORT: Mahavikasaghadi pushes the government! Ministry of Defense cancels Purandar airport site
त्यामुळे आघाडी सरकारला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. आता पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार की नाही यावरून राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे.
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संरक्षण मंत्रालयाने नवीन जागेला साईट क्लिअरन्स म्हणजे जागा परवानगी नाकारली असल्याची माहिती मराठा चेंबरचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.
संरक्षण मंत्रालयाने जागेची मंजुरी रद्द केली आहे. त्यामुळे पुणे येथे नवीन विमानतळाच्या योजनेबाबत राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावे अशी विनंती त्यांनी केली आहे.तत्कालिन फडणवीस सरकारने पुंदर येथील जागेची निवड अंतीम केली होती. त्याला संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली होती.
मात्र, आघाडी सरकार आल्यानंतर त्या जागेत बदल करण्यात आले. या नवीन बदलांचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालय आणि केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता. आता संरक्षण मंत्रालयाने परवानगी नाकारल्यानंतर आघाडी सरकार काय भुमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App