वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे निर्बंध हटविले आहेत. आजपासून पुणेकरांना आणखी मोकळा श्वास घेता येणार आहे. पुण्यात आजपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहे तर हॉटेल्स, बार आणि रेस्टरंट रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहतील. Punekar to breathe freely from today; All shops will be open until 7 p.m.
नव्या नियमावलीनुसार, सर्व दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत खुली राहतील. हॉटेल सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत सुरू राहतील आणि पार्सलसेवा रात्री 11 पर्यंत सुरू असेल. मॉल्स, थिएटर्स, नाट्यगृह पन्नास टक्के क्षमतेने खुली राहणार आहेत. तसंच इतर दुकांनाच्या वेळेतही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाढ केली आहे.
हॉटेल्स बार, रेस्टारंट रात्री 10 पर्यंत खुली राहणार आहेत. पण, पन्नास टक्के क्षमतेनं परवानगी आहे. वाचनालये, क्लास सुरू होणार आहेत. उद्याने आणि स्पोर्ट्स देखील दोन वेळा खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे.
शनिवारी ,रविवारी अन्य दुकाने बंद
अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने शनिवारी ,रविवारी मात्र बंद राहणार आहे. अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने आणि हॉटेल्सच्या या विकेंड लॉकडाऊन बाबत पुढील शुक्रवारी 18 जून रोजी आढावा घेतला जाणार आहे, त्यानंतर पुढील सूचना दिली जाईल.
शहरात संचारबंदी रात्री 10 पासून सुरू
उद्याने सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत खुली राहणार आहे. स्पोर्ट्स, क्रीडांगणे देखील सकाळी 5 ते 9 संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत खुली राहणार आहे. तसंच अभ्यासिका, वाचनालये 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी 7 पर्यंत सुरू राहणार आहेत.
कार्यक्रमावर निर्बंध
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी निर्बंध घालून देण्यात आले आहे. 50 लोकांच्या उपस्थितीत 7 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित करायला परवानगी मिळाली आहे.
येथे ई-पास आवश्यक
लेव्हल 5 असलेल्या ठिकाणी जायचं तर ई-पास आवश्यक असणार आहे. शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू झाली आहे. खाजगी कार्यालये मात्र 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App