विशेष प्रतिनिधी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेच्या १८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठताना विजेतेपदाला गवसणी घातली. एसएनबीपी संस्थेने पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी संबलपूर विद्यापीठ संघाचा ३-० असा पराभव केला. Pune University wins Inter University Hockey Tournament for the first time
राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणारा तालेब शाह पुणे विद्यापीठ संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात तालेबने दुसऱ्या आणि ६०व्या मिनिटाला गोल केला. पुण्याचा तिसरा गोल प्रज्वल मोहरकर याने २२व्या मिनिटाला केला. पश्चिम विभागातून राष्ट्रीय स्तरावरील आंतरविद्यापीठ स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारा पुणे विद्यापीठाचा संघ हा दुसराच संघ ठरला. यापूर्वी अशी कामगिरी २०१३ मध्ये जवाहरलाल नेहरु पीजी महाविद्यालय भोपाळ संघाने केली होती.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात व्हीबीएसपी विद्यापीठ जौनपूर संघाने लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ संघाचा ४-२ असा पराभव केला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ एसएनबीपी समूहाचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. डी. के. भोसले यांच्या हस्ते पार पडला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App