कॅप्टन साहेब पंजाबमध्ये हॉकी स्टिकने किती गोल मारणार??; काँग्रेस, अकाली दल, आप धास्तावले!!


वृत्तसंस्था

चंडीगढ : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेसला त्यांनी मागितलेले हॉकी स्टिक आणि बाॅल हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. या निवडणूक चिन्हामुळे पंजाबच्या राजकारणात खुमासदार चर्चा सुरू झाली आहे.How many goals will Captain Saheb score with a hockey stick in Punjab ??; Congress, Akali Dal, you are scared !!

कॅप्टन साहेब हातातल्या हॉकी स्टिकने पंजाबच्या राजकारणात किती गोल मारणार?, ड्रिब्लिंग करून कोणाचा फोन करणार?, कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पास देणे, पेनल्टी कॉर्नर मारणे या राजकीय खेळातील कौशल्यामुळे कोणकोणते पक्ष निवडणुकीच्या मैदानात आपटी खाणार? याची ही चर्चा आहे.



कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेसने आपल्या पक्षासाठी हॉकी स्टिक आणि बाॅल हे चिन्ह मागितले होते. त्यांना निवडणूक आयोगाने पक्ष म्हणून मान्यता देत ते चिन्ह बहाल केले आहे. पंजाब लोक काँग्रेस, भाजप आणि सुखदेव सिंग धिंडसा यांचा संयुक्त अकाली दल या तीन पक्षांची युती विधानसभेची निवडणूक लढवत आहे.

पंजाब लोक काँग्रेसला आता अधिकृत मान्यता आणि निवडणूक चिन्ह मिळाल्याने पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. काँग्रेसचे अनेक विद्यमान आमदार पंजाब लोक काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक आहेत. या पार्श्‍वभूमीवर पक्षाला पंजाबमध्ये लोकप्रिय असलेल्या हॉकी खेळाचे चिन्ह मिळणे हा राजकीय शकुन मानला जात आहे.

How many goals will Captain Saheb score with a hockey stick in Punjab ??; Congress, Akali Dal, you are scared !!

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात