भटक्या कुत्र्यांबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांविरुद्ध पुणेकरांचे थेट पंतप्रधान कार्यालयाला साकडे, नियमांच्या गैरवापराची तक्रार


प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील काही रहिवाशांनी अ‌ॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांविरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडे दाद मागितली आहे. सध्याचे नियम आणि दिशानिर्देश कुत्र्यांच्या बाजूने एकतर्फी असल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे.Pune residents complain directly to PM Office against stray dog guidelines, abuse of rules

यासंदर्भात एक ऑनलाइन याचिका करण्यात आली असून मानव आणि प्राणी यांच्या अधिकारांमध्ये संतुलन राहण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती त्यातून करण्यात आली आहे.लहान मुले असुरक्षित

याचिकेत एकूणच परिस्थितीच्या गांभीर्याचेही वर्णन करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार रेबीजमुळे जगात होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी एक तृतीयांश मृत्यू भारतात होतात. त्यावरून याचे गांभीर्य लक्षात येते. यात लहान मुले सर्वात असुरक्षित असतात. बहुतांश वेळा तेच अशा घटनांमध्ये बळी पडतात. अलिकडच्या काही वर्षांत कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अ‌ॅनिमल वेल्फेअर बोर्डाची नवी मार्गदर्शक तत्त्वे आणि त्याचा गैरवापर यासाठी कारणीभूत असल्याचे या रहिवाशांचे म्हणणे आहे.

मार्गदर्शक तत्त्वे एकतर्फी

भटक्या कुत्र्यांबाबतची मार्गदर्शक तत्त्वे एकतर्फी आहेत. प्राणी आणि मानव यांच्या अधिकारांमध्ये समतोल असणे गरजेचे असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या कुत्र्यांना ठरवून दिलेल्या क्षेत्राबाहेर खाऊ घालण्यास नागरिकांनी विरोध केला तर, विरोध करणाऱ्यांना त्रास देण्यासाठी या मार्गदर्शक तत्वांचा गैरवापर केला जात असल्याची तक्रार केली जात आहे. त्यातून वैमनस्य निर्माण होते आणि वातावरण बिघडते असेही सांगण्यात आले.

नियमांचा गैरवापर

एका रहिवाशाच्या मते, या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या काही सामाजिक संघटना पैसा कमावण्यासाठी नियमांचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुले आणि वृद्धांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांना मानवांबद्दल सहानुभूती नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मानव-प्राणी संघर्ष

भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणारे (फिडर) आणि प्राण्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांची मते मात्र वेगळी आहेत. प्राण्यांच्या जागेवर मानवी अतिक्रमणामुळे मानव आणि प्राणी संघर्ष निर्माण होतात. लोकांनी प्राण्यांचे वर्तन अधिकाधिक समजून घेणे गरजेचे असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या विरोधात सुरू केलेल्या या मोहिमेला मात्र देशभरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे समोर आले आहे.

Pune residents complain directly to PM Office against stray dog guidelines, abuse of rules

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात