आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वारगेट पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नीलेश नवलाखा यांनी केली आहे. pune NCP member demanded register crime against the Rana couple
विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत जाणूनबुजून महाराष्ट्राची शांतता भंग करून दंगली भडकविण्याचे काम केल्याप्रकरणी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वारगेट पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नीलेश नवलाखा यांनी केली आहे.
राणा जोडप्याला शनिवारी मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. राणा दाम्पत्यावर मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करणे, दंगल भडकविणे, महाराष्ट्राचा अपमान करणे, राज्य शासनाविरूध्द कट रचणे, अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी नवलाखा यांनी केली आहे. त्यांच्यावर मुंबईत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता पुण्यातही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App