Sharad Pawar : पुणे जिल्ह्यात पवारांच्या राष्ट्रवादीला डोकेदुखी; पण पवारांची सांगली, कोल्हापूरात मुशाफिरी!!

Pune district ncp pqwar

विशेष प्रतिनिधी

पुणे : शरद पवारांच्या  ( Sharad Pawar  ) राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यात डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेस आणि मुस्लिम राजकीय मंचाने पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी केली आहे. पण पवार मात्र त्या समस्येकडे लक्ष देण्याऐवजी सांगली, कोल्हापूर, सोलापूरात राजकीय मुशाफिरी करीत फिरत आहेत.

पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पडली. त्याचा फायदा घ्या. पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे आमदार वाढवा, असा कानमंत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्यानंतर पुण्यातले काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच ऍक्टिव्हेट झाले. त्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या हक्काच्या पर्वती आणि हडपसर मतदार संघावर दावा सांगायला सुरुवात केली. पवारांचे कार्यकर्ते काँग्रेस विरोधात पुण्याला बोलायला लागले.



2 तरी मुस्लिम उमेदवार हवेत

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पुण्यातला हा संघर्ष कमी पडला म्हणून की काय, पुण्यातल्या मुस्लिम राजकीय मंचाने महाविकास आघाडीला फक्त मुसलमानांची मते मिळणार नाहीत. त्यांना लोकप्रतिनिधित्व द्यावे लागेल असे सांगत पुण्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या 21 पैकी 2 मतदारसंघांमध्ये तरी मुस्लिम उमेदवारच द्यावेत असा आग्रह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडे, प्रामुख्याने राष्ट्रवादीकडेच धरला आहे. त्यातल्या त्यात हडपसर मतदारसंघावर मुस्लिम राजकीय मंचाने दावा ठोकला आहे. या मुस्लिम राजकीय मंचावर प्रामुख्याने कोंढव्यातील मुस्लिम समाज घटक एकत्रित आले आहेत.

 संजय काकांनी घेतली पवारांची भेट

पण स्वतः शरद पवार यांनी मात्र पुणे जिल्ह्याकडे लक्ष न देता सांगली, सोलापूर आणि कोल्हापुरात राजकीय मुशाफिरी चालू ठेवली आहे. कोल्हापुरात पवारांनी समरजीत सिंग घाटगे यांना भाजपमधून फोडून राष्ट्रवादीत आणले. त्यांना कागलमधून उमेदवारी जाहीर करून टाकली. सांगलीचे भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांनी पवारांची भेट घेतली. त्यामुळे चांगली भाजपमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यात होणारा संभाव्य तोटा इतर जिल्ह्यांमधून भरून काढण्याचा पवारांचा यातून प्रयत्न दिसतो आहे.

Pune district ncp pqwar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात