महाराष्ट्रा मधील भरती परीक्षा घोटाळ्याचे प्रकरण उजेडात आणण्यासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या महाडा परीक्षा भरती घोटाळातील प्रमुख तीन आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.
प्रतिनिधी
पुणे –म्हाडाच्या अंर्तगत गट अ,ब,क पदांची परीक्षा घेण्याकरिता जी.ए.साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी प्रा.लि. कंपनीची नियुक्ती करण्यात आली हाेती. मात्र, कंपनीचा संचालक डाॅ.प्रितिश देशमुख याने एजंटच्या मदतीने परीक्षेपूर्वीच पेपर फाेडण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली हाेती. सदर प्रकरणाचा पुणे सायबर पाेलीसांनी तपास करत, डाॅ.प्रितिश देशमुख (वय-३२, मु.रा.वर्धा), एजंट अंकुश हरकळ (४४,रा. किनगावराजा,बुलढाणा), संताेष हरकळ (४२,रा.चिखलठाणा, आरंगाबाद) या तिघां विराेधात बुधवारी प्रथमवर्ग न्यायदहडाधिकारी श्रध्दा डाेलारे यांच्या न्यायालयात तीन हजार ५०० पानांचे दाेषाराेपपत्र दाखल केले आहे.Pune cyber police field chargsheet in Mahada Exam scam
याप्रकरणात अातापर्यंत एकूण सहाजणांना अटक करण्यात आलेली आहे. देशमुख आणि हरकळ बंधू यांच्या शिवाय जमाल इब्राहीम पठाण (वय-४७,रा.जळकाेट,लातूर), कलीम गुलशेर खान (५२,रा.बुलढाणा), दिपक विक्रम भुसारी (३२,रा.बुलढाणा) या आराेपींना ही अटक करण्यात आली आहे.
म्हाडाचे वतीने गट अ,ब,क या पदांचे परीक्षा घेण्याकरिता जी.एस.साॅफ्टवेअर कंपनी साेबत करार केला हाेता. कंपनीचे संचालक डाॅ.प्रितिश देशमुख याने महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्र विकास प्रधिकरण यांनी निश्चित केलेल्या विविध १४ संवर्गातील गट अ,ब,क रिक्त पदांची भरती प्रक्रिया दिनांक १२,१५,१९,२० डिसेंबर २०२१ राेजी घेण्यात येणार हाेती.
सदर परीक्षेची प्रश्नपत्रिका गाेपनीय ठेवण्याबाबत आदेश असतानाही देशमुख याने गाेपनियतेचा भंग करण्याचे उद्देशाने स्वत:चे स्वार्थाकरिता स्वत:जवळ त्याचे लॅपटाॅप मध्ये व पेनड्राईव्हत प्रश्नपत्रिका बाळगून कंपनीचे व्यतिरिक्त संताेष हरकळ, अंकुश हरकळ यांचेसह एकत्र येवून म्हाडाचा परीक्षेचा पेपर फाेडताना मिळून आलेला आहे.
सदर गुन्हयाचा तपास सायबर गुन्हे शाखेच्या पाेलीस उप आयुक्त भाग्यश्री नवटक्के, एसीपी विजय पळसुले, वपाेनि डी.हाके यांचे मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, पाेलीस कर्मचारी प्रवीण राजपूत, मंेगश नेवसे, सारिक दिवटे यांचे पथकाने केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App