पर्यटनस्थळे बंद ठेवून त्या परिसरात व्यावसाय करणार्या लहान व्यावसायिकांवर जिल्हा प्रशासनाकडून अन्याय केला जात असल्याचा मुद्दा मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी उपस्थित केला होता.Pune: Corona Restriction Existence Suite, Section 144 canceled from today; All tourist spots opened
विशेष प्रतिनिधी
पुणे : मागील काही दिवसातील कोरोनाची परिस्थिती बघून पुणे जिल्ह्यातील काही निर्बंध उठवण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव, खुली मैदाने, पर्यटनाच्या ठिकाणी असलेले सर्व दुकाने, हॉटेल्स आणि पर्यटनस्थळे आजपासून खुली करण्यात येत आहेत असे जाहीर केले आहे. तसेच या आदेशानुसार लागू असलेले कलम १४४ रद्द करण्यात आले आहे.
तसेच पुढे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यासह मावळातील सर्व पर्यटनस्थळे आजपासून खुली करण्याचे तसेच लोणावळा परिसरातील दुकाने खुली करण्याचे आदेश दिले आहेत.कारण मावळ मधील लोणावळा हा पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो.
पर्यटनस्थळे बंद ठेवून त्या परिसरात व्यावसाय करणार्या लहान व्यावसायिकांवर जिल्हा प्रशासनाकडून अन्याय केला जात असल्याचा मुद्दा मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी उपस्थित केला होता.दरम्यान या पर्यटनस्थळांवर छोट्या व्यावसायकांना व्यावसाय करण्याची मुबा द्या अशा सूचना राज्याचे पालकमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल जिल्हा आढावा बैठकीत दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App