हा जलतरण तलाव महापालिकेचा असून कासारवाडी येथे आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील जलतरण तलावातील क्लोरीन वायूची गळती झाल्याने सुमारे 20 जण बेशुद्ध झाले आहेत. हा जलतरण तलाव महापालिकेचा असून कासारवाडी येथे आहे. अचानक क्लोरीन वायूची गळती झाल्याने जलतरण तलावात पोहण्यासाठी आलेल्या 20 ते 22 जणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच जवळच क्लोरीन वायू पसरल्याने लोकांना खोकला व घसादुखीचा त्रास होऊ लागला. Pune Chlorine gas leak in swimming pool 20 people who came to swim unconscious admitted to hospital
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात 20 ते 22 जण पोहत होते. यावेळी जलतरण तलावाची देखभाल करणारे आणि सुरक्षा रक्षकही उपस्थित होते. अचानक क्लोरीन वायू पसरू लागला, त्यामुळे पोहणाऱ्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काहींची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध झाले.
घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना तसेच पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आली. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना वायसीएम रुग्णालयात दाखल केले. एका दहा वर्षीय पीडित मुलीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. जलतरण तलावाजवळील लोकांची ये-जा बंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App