
वृत्तसंस्था
पुणे : पुण्यातील कमाल तापमान पुढील चार दिवस 39 अंश सेल्सिअस राहाणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे, तर ५ तारखेला कमाल तापमानात पुन्हा वाढ होणार आहे. Pune 39 degrees Celsius The maximum temperature will rise
राज्यातील अनेक भागात काही दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. 31 मार्चलाही विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. मात्र, यानंतर आता विदर्भातील नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचं चित्र आहे.
पुण्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहाणार असल्याचा अंदाजही हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे. मुंबईमध्ये आज सकाळी साडेआठ वाजता 32.8 अंश सेल्सिअस तर पुण्यात 36.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
त्यामुळे, मुंबईच्या तुलनेत पुणेकरांना उकाड्याचा अधिक सामना करावा लागला. पाच तारखेला पुण्यात 40 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद होईल, अशी माहिती हवामान शास्त्र विभागाच्या संकेतस्थळावर दिली आहे.
राज्यात तापमान वाढले :
उत्तर भारतातून येणाऱ्या कोरड्या हवामानामुळे राज्यातील अनेक भागात तापमान वाढले आहे. दोन ते तीन दिवस पुण्यासह राज्यातील अनेक भागात याचा प्रभाव दिसणार असल्याचं भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळावर स्पष्ट होते. मात्र, तापमान वाढीमुळे रस्त्यांवर नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही तापमानात काही प्रमाणात वाढ झाली.