पुणे, बारामती, नाशिकमध्ये गारठा हंगामातील कमी तापमानाची नोंद

वृत्तसंस्था

पुणे : पुणे, बारामती, नाशिकमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात 8.6 तर बारामतीत 8.8 अंश सेल्सिअस एवढे तापमान मंगळवारी सकाळी नोंदले गेले आहे. जळगावात सर्वात कमी म्हणजे 7 अंश तापमान होते. राज्याच्या अनेक शहरात तापमान 1 अंश सेल्सिअसने घसरले आहे. Pune Baramati Nashik recorded low temperature during cold season

प्रमुख शहरातील किमान तापमान

सातारा 10.6, नाशिक 9.1, महाबळेश्वर 12.7, सांगली 13.9, औरंगाबाद 10.7, नांदेड 10.7, अकोला 10.5, नागपूर 10.6, यवतमाळ 10 अंश सेल्सिअस एवढे तापमान होते.
उत्तर भारतातील थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहू लागल्याचा हा परिणाम आहे.माघ महिन्यात विशेषतः शिवरात्रीनंतर राज्यातील थंडी हळूहळू कमी होत जाणार आहे. तोपर्यंत राज्यात गारठा कायम राहणार असून पारा कमी जास्त होत राहणार आहे. तसेच दाट धुक्याचा अनुभवही नागरिकांना पहाटे घेता येणार आहे.

Pune Baramati Nashik recorded low temperature during cold season

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*