वृत्तसंस्था
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरामध्ये यंदा पब्लिकऑड्रेस सिस्टीम कामाची ठरली आहे. त्यामुळे सुमारे साडेतीन लाख लोकांना एकाच वेळी संदेश पोचविणे प्रशासनाला शक्य झाले आहे. देशामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग राबविला असून तो कमालीचा यशस्वी ठरला आहे.Public address system works in floods in Kolhapur district; The administration’s message reached three and a half lakh people in an instant
पालकमंत्री सतेज पाटील, तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रयत्नातून ही सिस्टिम उभी राहिली. पुरामध्ये नागरिकांना सतर्क करण्यासाठी, पंचगंगेची पाण्याची पातळी सांगण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी ही यंत्रणा उपयोगी पडली आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात १२९ ठिकाणे ही सिस्टिम बसवली आहे.
ही यंत्रणा केवळ जिल्ह्यातील चारच अधिकारी वापरू शकणार आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालिका आयुक्त यांचा समावेश आहे. या सिस्टीम वरून नागरिकांना संदेश देता येतो. महापुराबरोबरच इतर अत्यावश्यक सेवेत याचा उपयोग प्रशासनाला करता येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ही यंत्रणा बसवल्यामुळे प्रशासनाचे काम खूप कमी झाले आहेत. अजून ४०० ठिकाणे ही सिस्टीम बसवण्याचे बाकी आहे. आतापर्यंत बसवलेल्या सिस्टीममधून साडे तीन लाख नागरिकांपर्यंत एकाच वेळी संदेश पोचवला आहे. प्रत्येक गाव निहाय देखील संदेश पोहोचवण्याची व्यवस्था या सिस्टीममध्ये केली आहे. अशा प्रकारची सिस्टीम इतर जिल्ह्यांमध्ये बसवली तर संकट काळात खूप मदत होऊ शकते.
दृष्टिक्षेपात सिस्टीम
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App