
विशेष प्रतिनिधी
जालना: भारतातील रेल्वेला एक रुपयामागे ४८ पैसे तोटा सहन करावा लागतोय. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा तोटा भरून काढण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याने रेल्वेचा कारभार रुळावर आला आहे, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.Provisions in Union Budge is made to control the losses of railways : Danve
जालन्यात दानवे यांच्या हस्ते रेल्वेच्या भुयारी पुलाचं उदघाटन आणि नवीन तसेच जुना जालना भागाला जोडणाऱ्या लोखंडी पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. रेल्वेचं उत्पन्न वाढवण्यात येत असून तोटा भरून काढण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत. यावेळी पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंटयाल उपस्थित होते.
- रेल्वेचा तोटा भरून काढण्यासाठी झाली तरतूद
- रेल्वेचा कारभार हळूहळू रुळावर आला आहे
- रेल्वेचं उत्पन्न वाढवण्यावर विविध उपाययोजना
- तोटा भरून काढण्यासाठी भरीव प्रयत्नांची जोड
- रावसाहेब दानवे यांच्या हस्ते भुयारी पुलाचं उदघाटन
- लोखंडी पुलाचा लोकार्पण सोहळाही उत्साहात