विशेष प्रतिनिधी
मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी लढताना आमचे एक वर्षांसाठी निलंबन झाले आहे. परंतु आम्ही सरकारच्या हिटलर प्रवृत्तीचा निषेध करतो, असे भाजपचे राम सातपुते यांनी सांगितले. Protest against Hitlerism: Ram Satpute; Claim suspended for public
तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की अन् शिवीगाळ प्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
ते म्हणाले, आमचं सोडा हो आम्ही जनतेसाठी निलंबित झालो आहोत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर दीड वर्षांपासून निलंबित असून घरातच असतात. आमचं निलंबन हे ठरवून झाले आहे. आम्ही आता सरकारच्या विरोधातील संघर्ष अधिक आक्रमकतेने करणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App