वृत्तसंस्था
मुंबई : नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून सुरू केल्या जाव्यात, असा प्रस्ताव शिक्षण संचालनालयान प्रधान सचिवांना दिला. तसेच उन्हाळी सुटी २ मेपासून लागू करावी, असे म्हंटले आहे. Proposal to start school from 13th June, 76 holidays throughout the year
शिक्षण संचालनालयाच्या प्रस्तावानुसार, सुट्टीचा कालावधी २ मेपासून तर सुट्टी १२ जूनपर्यंत असणार आहे. तर नव्या शैक्षणिक वर्षात १३ जून रोजी विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा सुरू होतील. प्रधान सचिवांनी अंतिम निर्णय घेतल्यानंतर शैक्षणिक वर्षाची नेमकी तारीख ठरणार आहे.
उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून गणेशोत्सव किंवा नाताळसारख्या सणांच्या सुट्ट्यांचे नियोजन करावे. एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असे म्हंटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App