prisoners To get Delicious dishes like chicken : तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना हॉटेलसारखे चविष्ट भोजन, चिकन आणि एनर्जी बारसारख्या स्वादिष्ट पदार्थांची व्यवस्था केली जाणार आहे. कैद्यांना अन्नाबद्दल तक्रार करायला जागाच राहणार नाही, अशी माहिती तुरुंगांचे अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली. prisoners To get Delicious dishes like chicken in Maharashtra, restaurant food and more will be available in soon
विशेष प्रतिनिधी
पुणे : तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना हॉटेलसारखे चविष्ट भोजन, चिकन आणि एनर्जी बारसारख्या स्वादिष्ट पदार्थांची व्यवस्था केली जाणार आहे. कैद्यांना अन्नाबद्दल तक्रार करायला जागाच राहणार नाही, अशी माहिती तुरुंगांचे अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली.
पुणे येथे पत्रकारांना संबोधित करताना सुनील रामानंद म्हणाले की, आगामी काळात मुंबईतील आर्थर रोड जेल बहुमजली असल्याचे प्रस्तावित आहे. ते म्हणाले की, राज्यभरातील तुरुंगातील कैद्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांना उत्तम भोजन मिळेल, याची दक्षता घेतली जाते.
ते म्हणाले की, कारागृहातून पॅरोलवर सुटण्यासाठी तयार असलेले 53 कैदी बाहेर जाण्यास नकार देत आहेत. कारण तुरुंग प्रशासन घरापेक्षा त्यांची जास्त काळजी घेत असल्याचे या कैद्यांचे म्हणणे आहे.
सुनील रामानंद म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये राज्यातील 60 तुरुंगात 152 टक्क्यांपेक्षा जास्त कैदी होते. कोरोनामुळे आतापर्यंत 4243 कैदी संसर्गित झाले असून यापैकी 4157 जण बरे झाले आहेत. कोरोना कालावधीत 13 हजार 115 कैद्यांना पॅरोलवर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती, त्यामुळे कैद्यांची संख्या कमी झाली आहे.
त्यांनी सांगितले की, राज्यात असे एकूण 9 तुरुंग आहेत जेथे टोटल लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने कोविड केंद्रे तात्पुरती सुरू करून जेल सुरू केले. या सर्वांचा फायदा म्हणजे आता जेलमध्ये फक्त 73 सक्रिय रुग्ण आहेत. 13 कैदी आणि 10 कर्मचारी यांचा यादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत 87 हजार चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कोरोनाविरुद्ध आतापर्यंत 23 हजार 423 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
सुनील रामानंद यांनी सांगितले की, मुंबईत बहुमजली कारागृह बांधण्याचा प्रस्ताव आहे. महिला व बालकल्याण विभागामार्फत चेंबूरमध्ये जमीन देण्याची तयारी सुरू आहे, त्याची परवानगी अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे मुंबईतील आर्थर रोड जेलचा भारही काही प्रमाणात कमी होईल. कारागृहात रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पुण्यात तसेच ठाणे, रत्नागिरी आणि नाशिकच्या तुरुंगांतही पर्यटन सुरू करण्याचा विचार आहे. कारागृह कर्मचाऱ्यांना पोलीस विभागाप्रमाणे कलम 197 नुसार संरक्षण मिळायला हवे. अनेकदा त्यांनाही बळाचा वापर करावा लागतो, परंतु असे केल्याने कर्मचार्यांना शिक्षा होते. त्यांना संरक्षण मिळत नाही. त्यांना संरक्षण देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
prisoners To get Delicious dishes like chicken in Maharashtra, restaurant food and more will be available in soon
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App