राष्ट्रपतींनी दिवसांसाठी स्वयंपाकींना राष्ट्रपती भवनात बोलावून घेतलं.
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : राष्ट्रपती द्रौपती मुर्मू शिर्डीच्या दौऱ्यावर आल्या होत्या, तेव्हा त्यांना शिर्डीच्या साई प्रसादालयातील मराठमोळे जेवण अतिशय आवडले. त्या शिर्डीतील प्रसादालयातील जेवणाच्या इतक्या प्रेमात पडल्या की त्यांनी तेथील स्वयंपाकींना काही दिवसांसाठी दिल्लीत राष्ट्रपती भवनात बोलावून घेतले. President Draupadi Murmu liked Marathmole food at Shirdis Sai Prasadalaya
राष्ट्रपती भवनाकडून शिर्डी संस्थानला त्याबाबत पत्र आले असून त्यानुसार गोरक्षनाथ कर्डिले आणि राहुल वहाडणे या दोन्ही स्वयंपाकींना २९ जुलैला रवाना होणार आहेत.
राष्ट्रपती साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आल्या तेव्हा त्यांनी हॉटेलमधील जेवणा ऐवजी साई प्रसादालयातील जेवणास पसंती दिली होती. तेव्हा त्यांना मेथी, मटकी, आलु जीरा, चपाती, साध वरण – भात, बटाटा वडापाव, सलाड, पापड, गावरान तुपाचा शिरा, शेंगदाणा चटणी असा जेवणात दिलेला मेनू त्यांना अतिशय आवडला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App