I.N.D.I.A आघाडीच्या मुंबईतील बैठकीच्या पूर्वतयारीत पवारांनी लक्ष घातले; संशयाचे मळभ दाटले!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मोदी विरोधकांच्या I.N.D.I.A आघाडीच्या मुंबईतील बैठकीच्या पूर्वतयारीत शरद पवारांनी लक्ष घातले आणि त्यामुळे बैठकीवरच संशयाचे मळभ दाटले, अशी स्थिती आली आहे. कारण I.N.D.I.A आघाडीच्या पूर्वतयारीच्या बैठकीसाठी प्रदेश काँग्रेसचे नेते शरद पवारांना यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन भेटले.Large scale suspicion over sharad pawar’s role in I.N.D.I.A opposition unity

25 – 26 ऑगस्टला I.N.D.I.A आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत 26 विरोधी पक्षांचे सुमारे 100 नेते सहभागी होणार आहेत. या बैठकीच्या पूर्वतयारीत शरद पवारांनी लक्ष घातल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. मात्र या बैठकीत काँग्रेसचे कोणीही केंद्रीय नेते सामील झाले नव्हते. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेते उपस्थित होते.मात्र शरद पवारांनी I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीच्या पूर्वतयारीत लक्ष घातल्याने या बैठकीच्या मूळ तयारी विषयी आणि तिच्या यशस्वीते विषयी शंका तयार झाली आहे.

एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादीतल्या संघर्षाबाबत नेमकी भूमिका स्पष्ट होत नाही. त्यांनी त्याबद्दल पूर्ण मौन धारण केले आहे. शरदनिष्ठ राष्ट्रवादीतून फक्त आमदार रोहित पवार पुढे येऊन बोलत आहेत. खासदार सुप्रिया सुळे आणि स्वतः शरद पवार यांनी राजकीय मौन धारण केले आहे. एकीकडे अजित पवारांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पाठवून दुसरीकडे शरद पवार I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीची पूर्वतयारी करत असल्याने त्यांच्याविषयीचा राजकीय संशय वाढला आहे.

शरद पवार खरंच अजित पवारांशी राजकीय संघर्ष करून मोदींच्या भाजपला विरोध करतील का??, हा कळीचा सवाल आहे.

26 विरोधी पक्ष भाजपला कट्टर विरोध करत आहेत. जे पक्ष I.N.D.I.A आघाडीत सामील झालेले नाहीत, त्या पक्षांचा भाजपला विरोध असण्याबरोबरच काँग्रेसलाही विरोध असल्याने त्यांनी अंतर राखले आहे. वायएसआर काँग्रेस, तेलंगणातील भारत राष्ट्र समिती ही त्याची उदाहरणे आहेत. पण शरद पवार मात्र राष्ट्रवादीतल्या संघर्षाबाबत मौन धारण करून I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीच्या पूर्वतयारीत लक्ष घालत आहेत, इथेच संशयाचे मळभ दाटले आहे.

तसाही I.N.D.I.A आघाडी उभी करण्यात शरद पवारांचा नेमका वाटा किती??, हाच मूलभूत प्रश्न आहे.

कारण शरद पवारांची “डबल गेम” खुद्द त्यांच्या राष्ट्रवादीला राजकीय दृष्ट्या परवडणारी असली, तरी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाला परवडणारी नाही. त्यांना भाजपचा कट्टर विरोध केल्याशिवाय आता गत्यंतर नाही. कारण त्याशिवाय त्यांचे महाराष्ट्रातले राजकारणात उभे राहणार नाही. अशा स्थितीत पवारांना केवळ ज्येष्ठतेचा मान देत इंडिया I.N.D.I.A च्या पूर्वतयारीत त्यांना सहभागी करून घेणे ही काँग्रेसची राजकीय दृष्ट्या चूक ठरू शकते, असा काँग्रेसच्याच वरिष्ठ नेत्यांचा होरा आहे. त्यामुळेच यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या बैठकीत काँग्रेसचा कुठलाही केंद्रीय नेता न फिरकता फक्त प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना पूर्वतयारीसाठी पाठविल्याची बातमी आहे.

म्हणूनच पवारांच्या एकूण राजकीय भूमिकेविषयी विरोधकांमध्ये संशयाचे मळभ दाट झाल्याची ही पहिलीच बैठक निदर्शक ठरली आहे.

Large scale suspicion over sharad pawar’s role in I.N.D.I.A opposition unity

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात