राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी; आंबा, काजू आणि द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान

मराठवाडा आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट, तर मुंबई आणि पुण्यातही पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाचा अंदाज

विशेष प्रतिनिधी

राज्यभरात ठिकठिकाणी आज पावसाने हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने सातारा, पाचगणी, महाबळेश्वर येथे सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस झाला.  तळकोकणातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. आंबोली, सिंधुदुर्ग, चौकुळ, गेळे परिसरात मुसळधार अवकाळी पाऊस झाला.  या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू आणि द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. Presence of unseasonal rain at various places in the state

हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट दिला असून मुंबई आणि पुण्यातही पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, सातारा जिल्ह्यातही पुढील तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सातारा महाबळेश्वर, पाचगणी वाई भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी पिकाला मात्र  मोठा फटका बसणार आहे.  या पावसाने  शेतात काढणीला आलेला भुईमूग उन्हाळी ज्वारी, गहू पिके तसेच आंब्याच्या भागातील लगडलेल्या कैऱ्यांवर या पावसाचा मोठा परिणाम होऊन जोराच्या वाऱ्यामुळे अनेक आंबा उत्पादकांना हा पाऊस नकोसा ठरला .

मध्य प्रदेशपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यभरात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. शुक्रवारी उकाडा जाणवत असताना दुपारपासून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.

Presence of unseasonal rain at various places in the state

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub