प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या या जागेच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीत यांच्यात जुळून आलेली असताना काँग्रेसमध्ये मात्र अंतर्गतच संघर्ष उफाळला आहे. “महाराष्ट्रातून प्रतापगडी आणि काँग्रेस हायकमांडवर टिकेची सरबत्ती” अशी स्थिती आली आहे. Pratapgadi from Maharashtra; Criticism of the Congress High Command
उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडने उतरवताच प्रतापगडी यांच्याऐवजी थेट काँग्रेस हायकमांड वरच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी टीकेची सरबत्ती केली आहे. पृथ्वीराज चव्हाण अभिनेत्री नगमा आणि आता पाठोपाठ विश्वबंधू राय यांनी काँग्रेस हायकमांड वर टिकास्त्र सोडले आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक आता चांगलीच चुरशीची झाली आहे. येत्या 10 जून रोजी राज्यातील राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी मतदान होणार असून, सर्व पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. पण काँग्रेसने या निवडणुकीसाठी दिलेल्या उमेदवारामुळे आता काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आता चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे.
काँग्रेसने थेट उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिल्याने पृथ्वीराज चव्हाण, अभिनेत्री नगमा या राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली असतानाच, आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वबंधू राय यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली खदखद व्यक्त केली आहे.
शायरीत काय खुबी आहे?
मुरादाबाद मधून तब्बल 6 लाख मतांनी हरणा-या इम्रान प्रतापगडी यांना अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्षपद दिले. त्यांनी आजवर एकही नगरपालिका निवडणूक सुद्धा जिंकलेली नाही तरी त्यांना आता थेट राज्यसभेची उमेदवारी दिली. एका व्यक्तीवर पक्ष एवढी मेहरबानी का करत आहे?, त्यांच्या शायरीत अशी काय खुबी आहे ज्यामुळे अन्य योग्य नेत्यांच्या कर्तृत्वाचा पक्षाला विसर पडला?, असे सवाल करणारे पत्र राय यांनी सोनिया गांधी यांना लिहिले आहे.
– शायरी येणे गरजेचे?
याआधी देखील पक्ष नेतृत्वापे नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर पंजाबच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. ते देखील प्रतापगढी यांच्याप्रमाणे शायरी करत होते. त्यामुळे पक्षात एखादे पद मिळवण्यासाठी शायरी येणे गरजेचे आहे का?, असा खोचक सवालही राय यांनी आपल्या पत्रातून केला आहे. महाविकास आघाडीमध्ये आधीच काँग्रेसचे नेते अपमानित होत आहेत. असे असतानाच आता पक्ष नेतृत्वही त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याची खंत त्यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App