वाढदिवसाच्या दिवशी खास पोस्ट शेअर करत प्रसाद ओकनी दिल्या अमृताला शुभेच्छा!

विशेष प्रतिनिधी

पुणे : मराठी मनोरंजसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अनेक सिनेमातून लोकांच्या मनावर गारुड करणारी रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातली ताईत झालेली अमृता ही चित्रपट सृष्टीतली गुणी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाते . आज अमृताचा वाढदिवस . तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चहा त्यांनी सिनेमासृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. prasad oak share post amruta khanvilkar birthday

गेल्यावर्षी अमृताने चंद्र या चित्रपटाच्या माध्यमातून अफाट लोकप्रियता मिळवली . तिचा हा चित्रपट सगळ्याच अर्थाने गाजला . या चित्रपटाच्या माध्यमातून अमृता आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक प्रसाद ओक यांची विशेष मैत्री झाली.

ही मैत्री आपल्याला अनेक मुलाखतीत समजली.प्रसाद ओकने आपल्या इन्स्टाग्रामवर अमृताबरोबरचा एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करीत प्रसादने लिहिले, “प्रिय अमृता…असे क्षण तुझ्या आयुष्यात वारंवार येवोत… ( म्हणून मुद्दाम हा तुझा आवडता फोटो टाकतोय ) कायम अशीच प्रसन्न, हसतमुख राहा. तुझ्या सगळ्या इच्छा-आकांक्षा देव पूर्ण करो हीच प्रार्थना!

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा! खूप खूप खूप प्रेम…!!!” प्रसादची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स करीत अमृताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

prasad oak share post amruta khanvilkar birthday

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात