विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी मंत्री रामदास कदम यांच्या कथित आॅडिओ क्लिपने शिवसेनेत भूकंप घडविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे प्रसाद कर्वे हे कडवे शिवसैनिक आहेत. एकेकाळी त्यांना मातोश्रीवर थेट प्रवेश होता. शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांसोबत त्यांनी कामही केल्याचे सांगितले जाते.Prasad Karve, the bitter Shiv Sainik who caused the earthquake in Shiv Sena, had direct access to Matoshri
प्रसाद कर्वे हे 2005 पासून माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून काम करतात. बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक मी आहे, असा दावा ते करतात. दापोली तालुक्यातील प्रसाद कर्वे हे पूर्वी मुंबईत कामाला होते. मुंबईत त्यांनी दत्ता साळवी, दत्ता नलावडे आणि गजानन किर्तीकर सारख्या नेत्यांसोबत काम केलं आहे.
आतापर्यंत त्यांनी विविध कार्यालयात जवळपास 13 हजार माहिती अधिकार अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या अजार्मुळे अनेक अधिकाऱ्यांवर कारवायाही झाल्या आहेत. कर्वे यांचा मुख्य व्यवसाय हा पौरोहित्य आहे. त्यांना एक मुलगा पुण्यात नोकरीला आहे. दुसऱ्या मुलाचा स्वत:चा टेम्पो आहे. अनिल परब यांच्या विरोधातील माहिती रामदास कदम यांना पुरवली असं वैभव खेडेकर म्हणाले होते. त्यामुळे प्रसाद कर्वे यांचं नाव चर्चेत आले आहे.
वैभव खेडेकर यांनी केलेल्या आरोपानुसार, रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे यांच्या माध्यमातून अनिल परब यांच्या रिसॉर्टबाबत माहिती मिळवली. नंतर ती किरीट सोमय्या यांना पुरवली गेली. अनिल परब आणि हे प्रकरण समाज माध्यमांवर यापूर्वीच आलेलं आहे. आता या संदभार्तील संभाषण ते माझे नसल्याचे म्हणत असतील तर त्याबाबत फॉरेन्सिक तपास करावा.
दुसरी गोष्ट म्हणजे जे प्रसाद कर्वे नामक माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपल्या ऑडिओ क्लीप चोरीला गेल्याच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. दुसरीकडे हे म्हणतात की त्या ऑडिओ क्लीप माझ्या नाहीत. यातच सगळा गौडबंगाल आहे. किरीट सोमय्या कोकणात येऊन उद्योजकांवर माहितीचा अधिकार टाकतात, सर्व माहिती मिळवतात. त्यांना स्थानिकांची साथ असल्याशिवाय ते एवढी मोठी डेअरिंग करुच शकत नाहीत.
प्रसाद कर्वे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. खेड नगरपरिषदेच्या भ्रष्टाचाराबाबत नगराध्यक्षांनी जे घोळ केलेले आहेत, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. तो भ्रष्टाचार मी माहिती अधिकारात काढला. त्यांनंतर कायदेशीरपणे त्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नगरसेवकांद्वारे प्रस्ताव दिले.
रामदास कदम आणि त्यांचे पुत्र कोट्यवधीचा निधी आणत असल्याने वैभव खेडेकर त्यांच्यावर वारंवार गंभीर आरोप करत आहेत. ज्यांनी त्यांना गुरु म्हणून राजकारणात उभे केले त्यांच्याविरोधात त्यांचा पोटशूळ आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App