विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन झालेल्या विशेष न्यायालयाने 2008 साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचा निकाल दिला. पुराव्याअभावी या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. याच दरम्यान कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद अस म्हणु नका, तर सनातनी दहशतवाद किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा, असे विधान केले. त्यानंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी या वक्तव्यावरुन पृथ्वीराज चव्हाण ह्यांना चांगलेच सुनावले.
भगवा आतंकवाद म्हणू नका, कारण भगवा हा रंग शिवाजी महाराजांचा होता, असं पृथ्वीराज चव्हाणांना सुनावलं. तर सनातनी आतंकवाद हा शब्द वापरल्याने तुम्हाला हिंदूंना बदनाम करायचे आहे का ? असा थेट सवाल प्रकाश महाजन यांनी केला. “पृथ्वीराज चव्हाण आपण इतके शिकलेले आहात, सुशिक्षित आहात. सनातनी परंपरा ही फक्त भारतात आहे. सनातनी परंपरा केवळ हिंदू मानतात. तुम्हाला हिंदूंना अतिरेकी म्हणायचे आहे का? हिंदूंना बदनाम करायचे आहे का? कॉंग्रेसला मतांचे राजकारण करायचे असल्याने ते आधीपासूनच हिंदू विरोधी आहेत. त्यामुळेच ते अशी भूमिका घेत आहात”, असा आरोप प्रकाश महाजन यांनी केला.
शिवाय “महात्मा गांधी देखील स्वतःला सनातनी म्हणायचे, ते सनातनी परंपरेचा अभिमान बाळगायचे, यावर तुमचे काय म्हणणे आहे ? असा सवाल देखील प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला. त्यांना आता महात्मा गांधी नाही, तर राहुल गांधी सोयीचे आहेत. त्यामुळे त्यांना काय आवडते, तेच पृथ्वीराज चव्हाण बोलतात, असा आरोपही प्रकाश महाजन यांनी केला.
पृथ्वीराज चव्हाणांविरोधात शिंदे गट देखील आक्रमक
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याविरोधात आता शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. शिंदे गटाने मुंबईतील टिळक भवनावर मोर्चा काढला. काही जणांना टिळक भवनात जाऊ दे, अशी मागणीही त्यांनी केली. मात्र पोलिसांनी भवनापासून काही अंतरावर तो मोर्चा रोखला.
पृथ्वीराज चव्हाण नेमकं बोलले तरी काय?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, भगवा हा महाराष्ट्रातील जनतेसाठी पवित्र शब्द आहे, तो शिवछत्रपतींच्या ध्वजाचा रंग आहे. महाराजांच कार्य महाराष्ट्राला स्वातंत्र्य देण्याच होत, इंग्रजांविरोधापूर्वीचा हा स्वातंत्र्य लढा आहे. आतंकवादाला रंगाशी जोडू नका. हा रंग वारकरी संप्रदायाचा आहे, संत तुकारामांचा आहे, संत ज्ञानेश्वरांचा आहे. तुम्हाला म्हणायच असेल तर सनातनी आतंकवाद म्हणा, हिंदूत्ववादी आतंकवाद म्हणा, पण रंग देऊ नका. आतंकवादाला धर्म नसतो, जात नसते, आतंकवादी हा खुनी असतो. स्वतंत्र भारतातील पहिली आतंकवादी घटना ही नाथूराम गोडसे नावाच्या माणसाने घडवली. त्याने राष्ट्रपित्याचा खून केला. तो कोणत्या धर्माचा होता? त्याने गोळी घालण्यापुरतं धर्मपरिवर्तन केल होतं का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App