Prakash Ambedkar : जी गाढवं विचारतायेत, दाऊद + पवार संबंध पुन्हा उकरले का??, त्यांच्यासाठी…

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Prakash Ambedkar  गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि शरद पवारांच्या संबंधांचा मुद्दा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तब्बल 30 वर्षांनी पुन्हा उचलून धरला. त्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर भाजपची बी टीम असल्याचा पुन्हा आरोप केला.

या आरोपाल प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले. सोशल मीडियावर ट्विट करुन प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचा भेटीचा 30 वर्ष जुना मुद्दा मी उपस्थित केल्यामुळे काही गाढवं लोक प्रश्न विचारत आहे. त्याचे माझ्याकडे सरळ उत्तर आहे. कारण मुंबई आणि देशासमोर धोका आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे मुंबईतील अंडरवर्ल्डच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. तो इतिहास पुन्हा समोर आला आहे. सर्वांना माहिती आहे की अंडरवर्ल्डने मुंबईत कोणाच्या मदतीने राज्य केले आहे.

अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अजून एक महिना बाकी आहे. मी निवडणुकीपूर्वीच हा मुद्दा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासमोर मांडला आहे. महाराष्ट्राला अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का ? जर नसेल तर विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी केले आहे.

आता येणारी पाच वर्षे मुंबई आणि देशासाठी खूप महत्वाची आहेत. जर अंडरवर्ल्डचे मित्र पुन्हा सत्तेत आले तर अंडरवर्ल्ड पुन्हा मुंबईवर राज्य करेल आणि  देशाची सुरक्षा धोक्यात आली असेल.

ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी चीनबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे मी काल देशासमोर चिंता व्यक्त केली आहे. बाबासाहेबांनी चीनच्या विस्तारवादी योजनांबद्दल सावधान केले होते. परंतु, काँग्रेसने बाबासाहेबांचे ऐकले नाही, त्यानंतर काय झाले हे आपल्या सर्वांना माहिती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अजून एक महिना बाकी आहे. मी निवडणुकीपूर्वीच शरद पवार आणि दाऊद यांच्या भेटीचा मुद्दा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासमोर मांडला आहे. महाराष्ट्राला अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का?? तसे राज्य नको असेल, तर महाराष्ट्राच्या जनतेने विचारपूर्वक मतदान करावे.

Prakash Ambedkar target to sharad pawar

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात