Prakash Ambedkar प्रकाश आंबेडकर म्हणाले- ठाकरेंची शिवसेना भाजपशी जुळलेली, कोणत्या अटींवर पाठिंबा दिला, खुलासा करा!

Prakash Ambedkar

विशेष प्रतिनिधी

वाशिम : विधानसभा निवडणुकीआधीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना स्पष्टपणे भाजपशी जुळलेली दिसत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते कोणत्या अटींवर भाजपला पाठिंबा देत आहेत, याचा त्यांनी खुलासा करावा, असे आव्हानही प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी वाशिम येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपशी युती करणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

उद्धव ठाकरेंची शिवसेना स्पष्टपणे भाजपशी जुळलेली दिसते. ते कोणत्या अटींवर पाठिंबा देत आहेत, याचा उद्धव ठाकरेंनी खुलासा करावा. हे पाच वर्ष आघाडीसाठी राहतील, असे त्यांनी भाजपकडून लिहून घेतले आहे का? असा सवाल आंबेडकरांनी केला आहे.

वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यात आले, तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे सर्वच खासदार संसदेत उपस्थित नव्हते, ज्याला विरोध करायचा होता, तो करण्यात आला नाही. उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांची मते घेतली, पण मुस्लिमांच्या समस्यांवर ते हामी देत नाहीयेत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभरातील नेत्यांच्या बॅगांची आणि गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. यवतमाळ येथे उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी झाल्यानंतर राज्यभरात आरोप – प्रत्यारोप सुरू झाले होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडिओ काढत याबाबत निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा औसा येथे सभेसाठी जाताना उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. आजही उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ शूट करत निवडणूक आयोगावर पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केला.

Prakash Ambedkar said- Thackeray’s Shiv Sena aligned with BJP, on what terms did it support, disclose!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात