विशेष प्रतिनिधी
मुंबई : Prakash Ambedkar आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रकाश आंबेडकर हे सध्या पुण्याच्या एका रुग्णालयात उपचार घेत असून समाज माध्यमावर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत मोठे विधान केले आहे.Prakash Ambedkar
विधानसभेच्या निवडणुकीनंतर ओबीसींचे आरक्षण थांबवले जाणार असल्याचे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आरक्षणवादी कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. एक्सवर प्रकाश आंबेडकर यांनी हा व्हिडिओ शेअर करत आवाहन केले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी सध्या आयसीयूमध्ये आहे. अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी दोन्हीही झालेली आहेत. आता विधानसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. ओबीसीसाठी देखील महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसींचे आरक्षण थांबवले जाणार आहे. तसेच दुसऱ्या बाजूला एसीसीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत आपले आमदार निवडून आले तर त्या ठिकाणी आरक्षणावरचा हल्ला थांबवता येईल. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना, उमेदवारांना, आरक्षणवादी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठिमागे उभा राहा”, असे प्रकाश आंबेडकर यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App