प्रकाश आंबेडकरांनी मागच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे 9 खासदार पाडले; आता त्यांच्या मनात काय? – पृथ्वीराज चव्हाण

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मागच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे 9 खासदार पाडले, त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे पाहावं लागेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. चव्हाण म्हणाले, त्यांनी व्यावहारिक मागणी करून आमच्यासोबत आलं पाहिजे, ते जर आले नाहीत तर गेल्या वेळी केला तोच प्रयत्न आहे का हे तपासावं लागेल. Prakash Ambedkar defeated 9 Congress MPs in the last election

चव्हाण म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी व्यावहारिक मागणी करून बाबासाहेबांचे संविधान वाचवले पाहिजे. जास्तीत जास्त लोक उभी करून काँग्रेसचे मतांमध्ये विभाजन करणे आणि उमेदवारांना पाडणं ही मोदींची स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे राजू शेट्टी असतील किंवा प्रकाश आंबेडकर, त्यांनी उमेदवार उभे केले तर फायदा आणि तोटा कोणाला होणार हे स्पष्ट आहे.



पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे हे मला आत जाऊन पाहता येणार नाही. मात्र मागच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यामुळे आमचे नऊ खासदार पडले हे खरं आहे. जर ते आमच्या सोबत आले नाहीत तर गेल्या वेळी केले तसाच प्रयत्न आहे का अशी शंका निर्माण होईल. मात्र मला वाटतं ते आमच्या सोबत येतील.

काँग्रेससोबत आले तर ते देशाचे नेते होतील

चव्हाण पुढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर जर आमच्या सोबत आले तर देशाचे नेते होतील, कारण देशात आंबेडकर हे नाव दुसऱ्या कोणाकडेच नाही. प्रकाश आंबेडकर सर्वांना ओळखतात, त्यामुळे त्यांनी जाऊन म्हटले की मला यायचं आहे तर त्यांना कोणी नाही म्हणणार नाही. त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे. मात्र, ते एका प्रवक्त्याच्या नावाने लिहिलं आहे. त्यामुळे तो खरगेंचा अपमान आहे असं आम्हाला वाटतं.

Prakash Ambedkar defeated 9 Congress MPs in the last election

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात