प्रतिनिधी
पुणे : लोकसभेसह प्रत्येक निवडणुकीला महाविकास आघाडी एकत्रित रित्या सामोरी जाईल. मात्र वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीचा काही संबंध नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मात्र आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत वेगळेच विधान केले आहे. शरद पवार यांच्याबरोबरचे मतभेद केव्हाच सोडून दिले आहेत. उलट वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती एकत्रित लढली तर महाराष्ट्रात विधानसभेच्या 150 जागा जिंकू आणि महाविकास आघाडी सोबत वंचित आघाडी राहिली तर तब्बल 200 जागांवर विजय मिळू शकेल, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. Prakash Ambedkar claims to win Shiv Sena – Vanchit 150 seats, while Mahavikas Aghadi combined 200 seats
वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेच्या ठाकरे गटाशी युती करताना शरद पवार यांच्याशी आपले मतभेद असल्याचे आणि पवारांवर आपण विश्वास ठेवत नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले होते त्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकेच्या तोफा टाकल्या होत्या खुद्द शरद पवारांनी वंचितशी महाविकास आघाडीचा काहीही संबंध नसल्याचे वक्तव्य आज कोल्हापूरमध्ये केले आहे.
पवार – भाजप संबंध : प्रकाश आंबेडकर वक्तव्यावर ठाम; भाजपसोबत जायला तयार, पण त्यांनी मनुस्मृती सोडावी!!
या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्याबरोबरचे मतभेद केव्हाच सोडून दिल्याचा दावा करत शिवसेना आणि वंचित आघाडी 150 जागा जिंकण्याचा तसेच जर वंचितला महाविकास आघाडीने बरोबर घेतले तर विधानसभा निवडणुकीत 200 जागा जिंकण्याचा दावा केला आहे.
शरद पवार यांच्याशी असलेले मतभेद सोडून दिल्याचा दावा आंबेडकरांनी केला असला तरी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश आंबेडकरांबाबत नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App