विशेष प्रतिनिधी
मुंबई – मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंबरोबर गेलेले वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आता मुस्लीम आरक्षणासाठी रझा अकादमीबरोबर जाणार आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि रझा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी ५ जुलैला मुंबईत विधिमंडळावर मोर्चा काढण्यात येणार आहे. prakash ambedkar and raza academy to hold long ,march in mumbai for muslim reservation
वंचित बहुजन आघाडी आणि रझा अकादमीच्या मोर्चाची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर निशाणा साधला. आंबेडकर म्हणाले, की कोर्टाने मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मान्य केलेले आहे.
मात्र, ठाकरे – पवार सरकारने अद्याप ते जाहीर केलेले नाही. आता सरकारने ते जाहीर करावे, या मागणीसाठी आम्ही मोर्चा काढणार आहोत. राज्यात कोरोनाचे गंभीर संकट आहे. करोनाच्या लाटांवर लाटा येऊ लागल्या आहेत. मात्र असे असले तरी आम्ही मोर्चा काढणारच, असा निर्धार आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
भाजपवर निशाणा साधताना आंबेडकर म्हणाले, की भाजपचे राजकारण आता लोकांच्या लक्षात आले आहे. उत्तर प्रदेशात निवडणूकीपूर्वी दंगल व्हावी यासाठी त्या पक्षाचे नेते प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर दंगल भडकवणाऱ्या व्यक्तींविरोधात कायदा होणे गरजेचे असून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायला पाहिजे. महाराष्ट्र सरकारबरोबरच केंद्र सरकारनेही निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App