प्रधानमंत्री किसान सन्माननिधी 14 वा हप्ता; महाराष्ट्रातल्या 85.66 लाख शेतकऱ्यांना 1866 कोटी रुपयांचा लाभ!!


प्रतिनिधी

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्याचा महाराष्ट्रातील 85.66 लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ झाला. सुमारे 1866 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात आज जमा झाले. Pradhan Mantri Kisan Sammannidhi 14th Installment

राजस्थानच्या सीकर येथे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, अपर मुख्य सचिव अनुपकुमार आणि ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले :

राज्यात पावसाला चांगली सुरूवात झाली आहे… पेरणी झाली का? नागली घेता का? भात लावणीसाठी यंत्राची मदत घ्या, कमी वेळेत जास्त काम होईल, शिवाय मनुष्यबळही कमी लागेल…नागली, वरईसह आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड करा, यातून उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

पारंपरिक पिकांसोबतच नव्या तंत्रज्ञानाची जोड देत पीक पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहचवण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून भात लागवडीसाठी आधुनिक यंत्रे अनेक ठिकाणी पुरविण्यात आली आहेत.

या यंत्रांचा वापर करा, ठाणे, पालघरच्या काही भागात नाचणी, वरीची उत्पादकता चांगली असून त्याचे क्षेत्र वाढवा, नाचणीला मोठी मागणी असून यंदाचे वर्ष हे तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्याच्या वितरणाच्या कार्यक्रमाचे कृषी विभागाच्या वतीने राज्यातील 13000 गावांमध्ये थेट प्रसारण करण्यात आले. यात 600000 पेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले होते.

 

Pradhan Mantri Kisan Sammannidhi 14th Installment

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात