विशेष प्रतिनिधी
नाशिक : प्रख्यात विचारवंत साहित्यिक पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांच्या साहित्याचा विविध अंगांनी अभ्यास करावा, त्यावर नाविन्यपूर्ण विचार मंथन करावे, या हेतूने चिंचवड मधील क्रांतिवीर चापेकर स्मारक संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलमने दोन दिवसीय अभ्यास संगिती आयोजित केली असून सार्वजनिक गणेशोत्सवानंतर येत्या 28 आणि 29 सप्टेंबर रोजी समरसता गुरुकुलम मध्येच तिचे सगळे कार्यक्रम होणार आहेत.
या संपूर्ण उपक्रमात डॉ. प्रभाकर मांडे यांच्या साहित्याच्या जागरा बरोबरच लोक रंगभूमी, मौखिक वाङ्मयाची परंपरा, गावगाड्या बाहेरील समाज आणि लोकमानस, लोकपरंपरेतील स्त्री प्रतिमा, तसेच खुद्द प्रभाकर मांडे यांच्या साहित्याचा विविध अंगांनी परामर्श घेणाऱ्या विषयांवर परिसंवाद आयोजित केले आहेत. यामध्ये साहित्य आणि लोकसंस्कृतीचे विविध अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत.
Anti-Rape Bill : पश्चिम बंगाल विधानसभेत अँटी रेप बिल मंजूर; पीडिता कोमात गेली अथवा मृत्यू झाला तर दोषीला 10 दिवसांत फाशी होणार
डॉ. प्रभाकर मांडे यांच्या स्नुषा लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. वृषाली मांडे आणि प्रभाकर देव यांची विशेष मुलाखत गिरीश प्रभुणे आणि रवींद्र गोळे घेणार आहेत. विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आणि जेजुरीच्या मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे यांचा विशेष सन्मान या अभ्यास संगितीमध्ये करण्यात येणार आहे.
92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते अभ्यास संगितीचे उद्घाटन होणार असून पद्मश्री रमेश पतंगे आणि मुंबई विद्यापीठाचे लोककला विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रकाश खांडगे हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि एॅड. सतीश गोरडे हे प्रमुख निमंत्रक आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more