एसटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ महाराष्ट्रातील वीज कर्मचारी भडकले; आज मध्यरात्रीपासून संपावर!!

दीड लाख वीज कर्मचारी, अभियंते आज मध्यरात्रीपासून संपावर, वितरण व्यवस्था कोलमडण्याची भीतीPower workers in Maharashtra erupted after ST workers; Strike from midnight today


प्रतिनिधी

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रातील वीज कर्मचारी देखील भडकले आहेत आपल्या मागण्यांसाठी आज (रविवारी) मध्यरात्रीपासून दीड लाख कर्मचारी संपावर जात आहेत. ऊर्जा सचिव आणि तिन्ही वीज कंपनी प्रशासनासोबत वाटाघाटीत सामंजस्य करार न झाल्याने दीड लाखांवर वीज कामगार, कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांनी रविवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे.

सोमवारी (ता. 28) सकाळी 10 वाजेनंतर औरंगाबादेतील मिल कॉर्नर येथील प्रादेशिक कार्यालयासमोर धरणे, निदर्शने, आक्रोश आंदोलन केले जाणार असल्याचे एसईएचे सचिव अविनाश चव्हाण यांनी सांगितले. संपामुळे वीज वितरण व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. दिव्य मराठी ने ही बातमी दिली आहे.



केंद्र आणि राज्य सरकारचे चुकीचे धोरण, महावितरणचा मनमानी कारभारामुळे तिन्ही वीज कंपन्यांतील वीज कामगार ते अधिकारी हैराण झाले आहेत. या विषयी वारंवार आवाज उठवूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे 41 संघटनांनी एकत्रित येऊन 28 व 29 मार्च रोजी संप पुकारण्याचा इशारा दिला होता. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले व शुक्रवारी प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे संजय खंदारे यांचासह प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

लिखित आश्वासन न मिळाल्याने संप कायम

प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी खासगीकरण होणार नाही. केंद्रिय बिल दुरुस्तीसाठी राज्य सरकारने परत पाठवले असून संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, लिखित ठोस आश्वासन न मिळाल्याने संप मागे न घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार रविवारी मध्यरात्रीपासून दीड लाख बाह्यस्रोत वीज कामगार, तंत्रज्ञ, लाईनमन स्टाफ, कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपात सहभागी झाले आहेत.

या आहेत मागण्या

केंद्र सरकारने विद्युत विधेयक 2021 आणले आहे. त्यामुळे राज्यातील 6 जलविद्युत प्रकल्पाचे खासगीकरण करण्याचा डाव आखला जात आहे, तो रद्द करावा.

16 शहरांत महावितरणऐवजी फ्रँचायजी नेमण्यासाठी हलचाली सुरु आहेत. याबाबत सत्य काय ते स्पष्ट करावे.

खासगीकरणाला कडाडून विरोध

30 हजार कंत्राटी कामगारांना वयाच्या 60 वर्षापर्यंत नोकरीचे संरक्षण द्यावे

कंपन्यांनी रिक्त पदावर नोकर भरतीयासह विविध प्रश्नांकडे लक्षच दिले गेले नाही. त्यामुळे संप पुकारल्याचे एसईएचे अध्यक्ष केदार रेळेकर आणि अविनाश चव्हाण यांनी सांगितले.

Power workers in Maharashtra erupted after ST workers; Strike from midnight today

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात