प्रतिनिधी
मुंबई – मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधत ११ एप्रिलला होणाऱ्या एमपीएससी परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. ‘कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दोन दिवसांनी होणाऱ्या या परीक्षेबाबत राज्य सरकारने योग्य भूमिका घ्यावी,’ अशी विनंती राज ठाकरे यांनी फोनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. ठाकरे – पवार सरकारमधले मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तर मुख्यमंत्र्यांना सगळ्याच परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. power minister nitin raut sees manoovad in corana vaccination utsav proposed by PM narendra modi
एमपीएससीची तयारी करणारे काही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यांमध्ये जावे लागणार आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे भीतीची स्थिती आहे. अशा वेळी परीक्षा पुढे ढकलणे योग्य, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माहिती दिली आहे.
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यभरात निर्बंध लागू केले आहेत. मात्र हा निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंनाही फोन करून सहकार्याचे आवाहन केले होते.
राज्यातील काही कॅबिनेट मंत्र्यांनी देखील परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एप्रिल महिन्यामध्ये रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा रद्द करून नव्याने नियोजन करावे, अशी मागणी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App