प्रतिनिधी
मुंबई : नुपूर शर्मा प्रकरणातून उदयपूर आणि अमरावती येथील जिहादी हत्याकांडामुळे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडिया तसेच ट्विटर हँडलवर मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी प्रत्येक सोशल मीडियावर लक्ष केंद्रित केले आहे. धार्मिक भावना दुखावणारे पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात येत आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटने रिझवान शेख याला अटक केली असून, त्याने एका खासगी वृत्तवाहिनीच्या निवेदिकेला ट्विटरवर धमकी दिली होती. Posts on social media that widen the religious divide are on the radar of Maharashtra Police
राज्यातील राजकीय वातावरणाबाबत असू द्या अथवा धार्मिक वाद असो सध्या सोशल मीडियावर त्याच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटत असून अनेकजण सोशल मीडियावर बोगस खाते उघडून राजकीय नेत्यांची टिंगलटवाळी करणाऱ्या पोस्ट, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकत आहे. या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन जातीय तेढ निर्माण होत आहे.
पोलिसांच्या रडारवर आक्षेपार्ह पोस्ट
राजस्थानमधील उदयपूर आणि अमरावती येथे झालेले हत्याकांड हे सोशल मीडियावरील पोस्टमुळे घडले. त्यानंतर अनेकांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया, ट्विटर खाते यांचा आधार घेतला. मात्र त्यांच्या या पोस्टमुळे दोन धर्मांमध्ये अधिक तेढ निर्माण होईल. तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पोस्टवर पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले असून, वादग्रस्त तसेच आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकणारे सोशल मीडियावरील खाते पोलिसांच्या रडारवर आहेत.
महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाचेही लक्ष
मुंबई पोलिसांकडून प्रत्येक सोशल मीडिया, ट्विटर खात्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे याची जवाबदारी देण्यात आली असून, गुन्हे शाखेकडून वादग्रस्त, धार्मिक भावना भडकवणारे, बदनामीकारक पोस्ट टाकणा-यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात येत आहे. वांद्रे येथे राहणाऱ्या रिझवान शेख याने नुकतेच एका खासगी वृत्तवहिनीच्या निवेदिकेला ट्विटवर धमकी देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी वांद्रे युनिटने अटक केली आहे. ही कारवाई मुंबईसह राज्यभरात सुरू असून महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाचे या सोशल मीडिया खात्यावर लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App