वृत्तसंस्था
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिन अगदी दोन दिवसांवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. 26 जानेवारीला देशाच्या कोणत्याही राज्यात दहशतवादी सर्वात मोठा हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Possibility of terrorist attack in Maharashtra; System ready, alert issued in the state
या दहशतवादी संघटनांकडून हल्ला होण्याची शक्यता
देशात G20 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे धोका आणखी वाढला आहे. लष्कर- ए- तैयबा, जैश- ए- मोहम्मद, आयसीसशी संबंधित संघटना अकीस, जमात- उल- मुजाहिद्दीन या संघटना हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना नेहमीप्रमाणे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयची साथ आहे, अशी माहिती समोर येत आहे.
दहशतवादी संघटनांमध्ये उच्चशिक्षित मुस्लिमांच्या भरतीचा पीएफआयचा कावा; ११ जणांविरूद्ध आरोपपत्र; वकीलही अटकेत
‘हे’ अधिकारी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर
देशातले बडे राजकीय नेते, सैन्यदल, पोलीस अधिकारी हे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. आयईडी, ड्रोन यांद्वारे सैन्यदल, पोलिसांच्या वाहनांवर हल्ल्यांची शक्यता आहे. तसेच, परदेशी नागरिकांना लक्ष्य करुन G20 परिषदेत खोडा घालण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. हल्ला नेमका कशाप्रकारे होईल याची माहिती सुरक्षा यंत्रणा घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App