प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या अखेरच्या ठरणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराचे शह – काट शह रंगले. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय ठाकरे मंत्रिमंडळ यांनी जरूर घेतला Politics of renaming : Shivsena and Congress confronted each other
परंतु याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेसच्या मंत्र्यांनी मांडलेला पुण्याचे जिजाऊ नगर आणि शेवटी नाव्हा शेवा हर्बर लिंक रोडला माजी मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यात आले नाहीत. त्यावर ठाकरे मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले नाही.
काँग्रेसने मांडलेले नामांतराचे विषय आता तसाच लटकत ठेवले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीतून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे दुसरे मंत्री असलम शेख हे मध्येच निघून गेले. उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्याच लोकांनी मला दगा दिला.
पण तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केले त्याबद्दल मी आभार मानतो, असे सांगत मंत्रिमंडळाची बैठक आटोपती घेतली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 10 निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App