प्रतिनिधी
नवी दिल्ली / मुंबई : पक्ष ताब्यात घेण्यासाठी एकीकडे शिवसेनेचा संघर्ष मुंबई – महाराष्ट्रातल्या रस्त्यांपासून सुप्रीम कोर्टापर्यंत सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तेजीत आली आहे. Political competition in NCP increased as posters of future chief minister ajit Pawar irrected in front of NCP office in Mumbai
शिवसेनेत मातोश्री भोवती शिवसैनिक गर्दी करत आहेत. शिवसेना भवनावर येण्याची हिंमत दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटलांनी पाठोपाठ अजितदादांची पोस्टर्स भावी मुख्यमंत्री म्हणून लावण्याची राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.
घराणेशाहीच्या अंतावर निवडणूक आयोगाचे कायदेशीर शिक्कामोर्तब; शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!!
जयंत पाटलांच्या वाढदिवशी त्यांच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा मतदार संघामध्ये भावी मुख्यमंत्री अशी पोस्टर्स अनेक ठिकाणी लागली होती. वाढदिवस संपल्यानंतर त्या पोस्टर्सचे महत्व संपले. पण कार्यकर्त्यांच्या मनातले बाहेर आल्याशिवाय राहिले नाही. हे झाले वाळव्या पुरते. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर अजितदादांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करून कार्यकर्त्यांनी पोस्टर झळकवली आहेत.
सुप्रिया सुळे यांचे नाव मराठी माध्यमांनी शरद पवारांच्या मनातल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून अनेकदा पुढे आणून त्यावर चर्चा घडवली आहे. पण त्यांची अद्याप तरी भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांनी पोस्टर्स लावल्याचे आढळलेले नाही.
अजितदादांची पोस्टर्स मात्र काही निमित्ताने काही शहरे आणि जिल्ह्यांमध्ये लागल्याचे याआधी दिसले आहे. आता मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर त्यांचेच भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लागल्याने राष्ट्रवादीतील मुख्यमंत्री पदाचे स्पर्धा तीव्र होत चालल्याची लक्षणे दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App