सर्व पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेला अलर्ट मोडवर
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवीन वर्ष येणार आहे आणि मोठ्या शहरांमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी सुरू झाली आहे. जुन्या वर्षाचा निरोप घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळे सज्ज झाले आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांनीही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.Police received a threat of bomb blast in Mumbai on the eve of New Year
मुंबईतही नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र नवीन वर्षाचे जल्लोष सुरू असतानाच मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला असून त्यात नववर्षाच्या दिवशी मुंबई शहरात बॉम्बस्फोट होतील, अशी धमकी पोलिसांना देण्यात आली आहे. या फोननंतर पोलीस धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत.
धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलिसांनी सर्व पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेला अलर्ट मोडवर ठेवले आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, गेल्या शनिवारी संध्याकाळी 6 वाजता धमकीचा फोन आला होता. त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी तपास केला मात्र अद्यापपर्यंत कोणताही पुरावा मिळालेला नाही.
मुंबईला बॉम्ब स्फोटाने उडवण्याची धमकी पोलिसांना मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मुंबई पोलिसांना अनेक धमकीचे फोन आले आहेत. मात्र नंतर हे सर्व कॉल फेक असल्याचे सिद्ध झाले. जे फक्त मुंबई पोलिसांना घाबरवण्यासाठी आणि धमकवण्यासाठी केले जाते.
2022 मध्ये मुंबई पोलिसांना मुकेश अंबानी यांचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. या वर्षीही एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून धमकी दिली होती की, तो मुंबईत स्फोट घडवून आणणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App