
प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या उद्या 18 फेब्रुवारी रोजी कोर्लई गावाला भेट देणार आहेत. कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या नावावर असलेल्या 19 बंगल्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार असल्याचेही सोमय्यांनी म्हटले आहे.Police notice for inspecting Bhujbal’s anonymous property
कोर्लईत पाहणीसाठी सोमय्यांचा दौरा शुक्रवारी असून त्यापूर्वी मुंबईत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्या सांताक्रूझ भागात असलेल्या बंगल्याची पाहणी केल्याप्रकरणी नोटीस देण्यात आल्याचे ट्विट किरीट सोमय्यांनी केले आहे. ठाकरे सरकार आणि पोलिसांनी माझ्याविरूद्ध आणखी एक नोटीस पाठवली असून भुजबळांच्या बेनामी प्रॉपर्टीची पाहणी केल्याबद्दल माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे किरीट सोमय्यांनी त्यात म्हटले आहे.
Thackeray Sarkar/Police ONE more Case against Me for visiting Ministry Chhagan Bhujabal's BENAMI Property
ठाकरे सरकार/पोलीसची माझा विरुद्ध आणखी एक नोटीस. छगन भुजबळ यांच्या सांताक्रुझ येथील 'बेनामी प्रॉपर्टी' ९ मजली बंगलोची पाहणी केल्याबद्दल माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल @BJP4India pic.twitter.com/fZ2SIyrQKp
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) February 17, 2022
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रॉपर्टीची पाहणी केल्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. मात्र, पोलिसांनी पाठवलेल्या नोटिसमध्ये कलम १८८ अंतर्गत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी याचे स्पष्टीकरण देण्यासाठी सोमय्यांना हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र संबंधित नोटीस किरीट सोमय्या यांनी करोना नियमावलीचा भंग केल्याबद्दल चौकशी करण्यासाठी आहे असे सांगण्यात येत आहे त्यामुळे सोमय्यांना सोशल मीडियावर काही सेक्शन मधून ट्रोलही करण्यात येत आहे.
– सोमय्यांचे शिवसेनेला पुन्हा आव्हान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले हरवले आहेत. रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019 मध्ये पत्र लिहिले आणि लिहून माझ्या नावावर बंगले करा असे सांगितले होते. बंगले मी दाखवणार नाही. तुम्हीच तिथे बंगले आहेत हे कायदेशीररित्या सिद्ध केले. मी तिथे बघायला गेलो. मला बंगले सापडले नाहीत. त्याबद्दल मी तक्रार केली आहे. त्यामुळे या बंगल्याबाबत ठाकरे कुटुंबीयांनी बोलावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर या बंगल्याबाबत का बोलत नाहीत? संजय राऊतच फक्त या बंगल्यांबाबत का बोलत आहेत? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. मला चप्पलेने मारणार ते ठिक आहे. पण हरवलेल्या 19 बंगल्यावर बोला. त्याचे उत्तर द्या, असे आव्हानच किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला दिले आहे.
Police notice for inspecting Bhujbal’s anonymous property
महत्त्वाच्या बातम्या
- विहिरी वरील स्लॅब तुटुन पाण्यात बुडाल्याने १३ जणांचा मृत्यू; उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात भीषण दुर्घटना
- तुम्हीही प्या आणि त्यांनाही पाजा : पोलिस अधिकाऱ्याला बारमध्ये कोका कोलाचे १०० कॅन वाटण्याचे दिले आदेश
- महाराष्ट्रात चुंबाचुंबी मात्र तेलंगणातील कॉँग्रेसच्या कट्टर विरोधकाला मुंबईत पायघड्या, उध्दव ठाकरेंनी केला तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना फोन
- पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली राधा स्वामी डेराच्या प्रमुखांची भेट
Array