विशेष प्रतिनिधी
पुणे : बड्या बापाच्या बेट्याने पोर्शे कार भरधाव वेगात चालवून दोन इंजिनियर्स बळी घेतले. त्या केस मध्ये बरेच उलट सुलट दावे प्रतिदावे केले गेले. या केस मध्ये बिल्डर विशाल अग्रवाल आणि पवार कनेक्शन समोर आले. राष्ट्रवादीचा हस्तक्षेप समोर आला, पण यासंदर्भातली सर्व कायदेशीर तपशील पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट करून सांगितले. Police Commissioner of Pune’s explanation of the law
कल्याणी नगरच्या पोर्शे कार अपघाताची केस ही ड्रंक अँड ड्राईव्ह किंवा रॅश अँड निगलिजन्सची नाही. ही केस “कल्पेबल होमीसाईड” म्हणजे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची असल्याचेही अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. त्यातून अमितेश कुमार यांनी मुख्य आरोपी वेदांत अग्रवाल, विशाल अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी केलेले सगळे दावे परस्पर फेटाळून लावले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील हिट अँड रन केसवर तपशीलवार खुलासे केले. कल्याणी नगर मधल्या पोर्शे कार अपघाताची केस भादंवि कलम 304 (अ), ड्रँक अँड ड्राईव्ह आणि रॅश अँड निगलिजन्स एक्टची नाही. एखाद्या व्यक्तीकडून दारूच्या नशेत गुन्हा घडला तर 304 (अ) आयपीसीचा गुन्हा होतो. या प्रकरणात 3 वर्षाची शिक्षा होते आणि बेलेबल ऑफेन्स असतो. पण आम्ही या प्रकरणात 304 कलम लावलं आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला गुन्ह्याची पूर्व कल्पना असल्याचे त्यात नमूद आहे. आपल्या हातून हत्या होऊ शकते हे आरोपीला माहिती होते हे त्याच्या वर्तवणुकीवरून दिसून येते, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
गुन्ह्याची कल्पना होती
आरोपी अल्पवयीन असताना देखील महागडी ऑटोमॅटिक गाडी चालवणे, एका पबमध्ये जाऊन दारू पिणे नंतर दुसऱ्या पबला जाऊन परत दारू देणे, त्यानंतर अरुंद गल्लीत गर्दी असताना, रहदारी असताना भरधाव वेगाने गाडी चालवणे याची आरोपीला माहिती होती. त्यांच्या कृत्याने जीवीतास हानी होऊ शकते, हे त्याला माहिती होते. त्यांचे दारु पितानाचे सीसीटीव्ही फुटेजही आमच्याकडे आहेत, असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
आरोपीचा ब्लड रिपोर्ट आला नाही. सुरुवातीला आरोपीचे ब्लड सँपल घेतले होते. ते फॉरेन्सिकला दिले. आम्ही ड्यु डेलिजन्स घेण्याच्या दृष्टीकोणातून आणखी ब्लड सँपल घेतलं होतं. पहिलं आणि दुसरं रक्त सँपल सेम आहे की नाही हे पाहण्यास आम्ही फॉरेन्सिकला सांगितलं आहे. आरोपीने अल्कहोल घेतलं होतं की नाही याची माहिती घेण्यासाठी पहिलं ब्लड सँपल घेण्यात आलं.
रिपोर्ट काहीही येऊ द्या
पहिलं ब्लड सँपल घेण्यात आली होती. त्यातील अल्कोहलची विचारणा करण्यात आली होती. या प्रकरणात आणखी एक ब्लड सँपल घेण्यात यावी असं वाटलं, त्यात काही मॅनेज झालं तर खबरदारी म्हणून आम्ही हे सँपल घेतलं आहे.
गुन्हा 8.09 वाजता घडला होता. ससूनमध्ये 11.00 वाजता त्याचं ब्लड सँपल घेतलं. त्यानंतर संध्याकाळी 7.00 ते रात्री 8.00 च्या दरम्यान दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दुसरं ब्लड सँपल घेतलं. डीएनए चाचणीसाठीचं हे सँपल घेतलं होतं. पण ब्लड रिपोर्ट काहीही येऊ द्या. पण ही केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही. या केसची दिशाच वेगळी आहे, असं त्यांनी सांगितलं. ब्लड रिपोर्टबाबत अधिक टिप्पणी करणं योग्य नाही. पण आरोपीला गुन्ह्याची जाणीव होती. त्याला काही कळतंच नव्हतं असं नव्हतं. आपल्या कृत्यामुळे गंभीर गुन्हा घडू शकतो हे त्याला पूर्णपणे ज्ञात होतं, असं त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App