भ्रष्टाचारविरोधी दक्षता जनजागृती सप्ताहात सकाळी ज्याने ‘लाच न घेण्याची आणि भष्टाचार न करण्याची’ प्रतिज्ञा करणारा पोलीस त्याच रात्री लाच घेताना गजाआड झाला. Police arrested accepting bribe amount
प्रतिनिधी
कोल्हापूर : ‘लाच घेणार नाही’, अशी सकाळी घेतलेली प्रतिज्ञा स्वतःच खोटी ठरवत ‘त्याने’ रात्रीच पाच हजार रुपयांची लाच घेतली. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याचा अंमलदार सागर इराप्पा कोळी (वय ४६, रा. श्रीरामनगर, उचगाव, ता. करवीर) असे या लाचखोराचे नाव आहे.
कोळीचे धाडस असे की ही लाच त्याने मंगळवारी मध्यरात्री थेट पोलीस ठाण्यातच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. वादातील कार परत मिळवून दिल्याबद्दल तक्रारदाराकडे संबंधिताने लाचेची मागणी केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.
मंगळवारपासून भ्रष्टाचारविरोधी दक्षता जनजागृती सप्ताह सुरु झाला झाला. यासाठी सकाळी जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात ‘लाच घेणार नाही, भष्टाचार करणार नाही’ अशी प्रतिज्ञा कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्याच रात्री लाचखोर पोलिसाला गजाआड व्हावे लागले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने मोटार कार विकली मात्र व्यवहार अपारा राहिल्याने ती परत मिळण्यासाठी त्याने शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी मोटारीबाबत संबंधिताशी चर्चा केल्यानंतर मोटारकार पोलीस ठाण्यात आणून लावली. त्यानंतर ती मूळ मालकाला परत देण्यात आली. मात्र मोटार परत मिळवून दिल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यातला शिपाई सागर कोळी याने मूळ मालकाकडे १५ हजार रुपये लाच मागितली.
यातले दहा हजार रुपये सोमवारी घेतले. दरम्यान संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात सापळा लावला. या वेळी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस शिपाई सागर कोळी जाळ्यात अडकला.
पोलीस शिपाई कोळीची मंगळवारी रात्री नऊ वाजता ड्यूटीवर आला. त्यावेळी तक्रारदार लाचेची रक्कम देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला. गर्दी असल्याने कोळीने त्याला मध्यरात्री बारा वाजता रक्कम घेऊन येण्यास सांगितले. तक्रारदार साडेबारा वाजता लाच देण्यासाठी पुन्हा पोलीस ठाण्यात गेले. यावेळी लाच स्वीकारताना कोळीला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोर पोलीस कोळीच्या उचगावमधील भाड्याच्या घराची झडतीही घेतली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App