हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिस ठेवणार बारकाईने लक्ष, मार्गदर्शक तत्त्वे जारी Holi festival
विशेष प्रतनिधी
मुंबई: देशभरात होळी सणाचे वातावरण आहे., लोक होळीचा सण Holi festival साजरा करण्याच्या तयारीत व्यस्त आहेत. तर पोलिस होळीच्या दिवशी धुडगुस घालणाऱ्यांवर करडी नजर ठेवून असणार आहेत. होळीसाठी मुंबई पोलिसांकडून विशेष सुरक्षा व्यवस्था केली जात आहे.
मुंबई पोलिस विविध ठिकाणी तैनात केले जातील. मद्यपान करून गाडी चालवण्याविरुद्ध विशेष मोहीम राबवली जाईल. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या, महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या आणि अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची कडक नजर राहणार आहे. मुंबई पोलिसांनी सर्वांना नियमांचे पालन करून होळीचा सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
होळीच्या दिवशी मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात सुमारे ११ हजार पोलिस तैनात केले जातील. पोलिस बंदोबस्तासाठी ७ अतिरिक्त पोलिस आयुक्त, १९ डीसीपी, ५१ एसीपी आणि ९१४५ पोलिस कर्मचारी असे १७६७ पोलिस अधिकारी तैनात असतील. याशिवाय संवेदनशील भागात एसआरपीएफ प्लाटून, आरसीपी प्लाटून, क्विक रिस्पॉन्स टीम, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि होमगार्ड्स देखील तैनात केले जातील.
पोलिस मार्गदर्शक तत्त्वे १८ मार्च २०२५ पर्यंत लागू असतील. जातीय तणाव टाळण्यासाठी, सुरक्षा राखण्यासाठी आणि चालू रमजान महिन्याला लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. सूचनांनुसार, सार्वजनिक मेळाव्यांमध्ये अश्लील गाणी, अश्लील हावभाव किंवा लोकांच्या भावना दुखावतील अशा आक्षेपार्ह घोषणांचा समावेश नसावा. यासोबतच, पाण्याचे फुगे फेकणे आणि लोकांवर जबरदस्तीने रंग लावणे यावरही बंदी असेल. मुंबई पोलिसांनी लोकांना नियमांच्या मर्यादेत होळीचा सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App