सातवा वेतन आयोग लागू झाल्याने PMPML कर्मचाऱ्यांचा आनंदोत्सव

विशेष प्रतिनिधी

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुणेकरांची सेवा करणाऱ्या PMPML कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेने अखेर सातवा वेतन आयोग लागू केला. यामुळे कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी फटाके वाजवून व पेढे वाटून आपला आनंद साजरा केला. PMPML employees rejoice over implementation of 7th pay commission

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चार दिवसांपूर्वी हजारो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पालिका भवनला मानवी साखळी करून घेराव घालण्यात आला होता. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या आंदोलनास आज यश आले आहे. आंदोलनानंतर येत्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विरोधात मोठा रोष निर्माण होऊ शकतो असे दिसताच सत्ताधाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला.



यासाठीचा ठराव नगरसेवक प्रदीप गायकवाड यांनी दिला होता तर त्यास अनुमोदन नगरसेविका नंदा लोणकर यांनी दिले होते. कामगार आनंद साजरा करत असताना प्रवक्ते प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी कामगार सेल अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, किरण थेऊरकर, सुनील नलवडे, राजेंद्र कोंडे, हरीश ओहळ, कैलास पासलकर उपस्थित होते.

PMPML employees rejoice over implementation of 7th pay commission

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात