Movie On Savarkar : मराठी आणि हिंदे सिनेसृष्टीतील मातब्बर दिग्दर्शक महेश मांजरेकर आता आपल्या नव्या चित्रपटाद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकरांची कहाणी जगासमोर आणणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बायोपिक बनवणारे चित्रपट निर्माते संदीप सिंग यांनी ‘स्वतंत्रवीर सावरकर’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी महेश मांजरेकर यांना साइन केले आहे. PM Naredra Modi Movie Producer Now signs Mahesh Manjrekar To Direct Movie On Swatantryaveer Savarkar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठी आणि हिंदे सिनेसृष्टीतील मातब्बर दिग्दर्शक महेश मांजरेकर आता आपल्या नव्या चित्रपटाद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकरांची कहाणी जगासमोर आणणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बायोपिक बनवणारे चित्रपट निर्माते संदीप सिंग यांनी ‘स्वतंत्रवीर सावरकर’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी महेश मांजरेकर यांना साइन केले आहे.
संदीप सिंग हे मित्र अमित वाधवानी यांच्यासमवेत हा चित्रपट बनवणार आहेत. 28 मे 1883 रोजी जन्मलेल्या विनायक दामोदर सावरकरांची महागाथा सांगण्यासाठी महेश मांजरेकर बर्याच काळापासून संशोधन करत आहेत. संदीप सिंह यांनी याचे सर्वाधिकार मिळवले आहेत. आता संदीप, महेश आणि अमित या तिघांनी भारतमातेच्या या महान सुपुत्राची कहाणी मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
वास्तवाशी नाळ जोडलेल्या आपल्या कथानकांमुळे महेश मांजरेकर यांना सिनेविश्वात प्रसिद्धी मिळाली. ‘वास्तव’, ‘अस्तित्व’ आणि ‘कुरुक्षेत्र’ यासारख्या हिंदी चित्रपटांनंतर महेश मांजरेकरांनी ‘काकस्पर्श’ आणि ‘नटसम्राट’सारख्या मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
PM Naredra Modi Movie Producer Now signs Mahesh Manjrekar To Direct Movie On Savarkar
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App