विशेष प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, पण महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र आणणारे हे दोन पक्ष मोदी विरोधी आंदोलनात मात्र पुण्यात एकमेकांपासून लांबच्या वेगवेगळ्या मैदानात दिसले. PM Modi Pune: Congress-NCP in anti-Modi agitation in different fields far from each other !!
काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे आगमनापूर्वी लोकमान्य टिळक चौक अर्थात अलका टॉकीज जवळ आंदोलन करून घेतले, तर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे रेल्वे स्टेशन जवळचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करून घेतले. हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसले आहेत, पण मोदी विरोधी आंदोलनात मात्र एकमेकांशी संबंध न ठेवता उलट चार मैलांचे अंतर ठेवत वेगवेगळी निदर्शने केली आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या दोन्ही आंदोलनांमध्ये आपापल्या पक्ष्यांचे शंभर-दीडशे कार्यकर्ते होते. त्यांनी काळे कपडे परिधान करून हातात “गो बॅक मोदी”चे फलक घेतले होते. दोन्ही पक्षांची आंदोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असली तरी प्रत्यक्षात मोदींचे पुण्यात आगमन होण्यापूर्वी ही आंदोलने गुंडाळण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more