विशेष प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. आजच्या दौऱ्यात तै विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. मोदी सकाळी ११ वाजता पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यानंतर त्यांचे साडेअकरा वाजता गरवारे मेट्रो स्थानक येथे आगमन होणार आहे. येथून ते पौड रोडवरील आनंदनगर स्थानकापर्यंत मेट्रो प्रवास करणार आहेत. त्यानंतर ते एमआयटी कॉलेजच्या प्रांगणात ऑनलाइन प्रणालीद्वारे विविध विकासकामांचे उद्घाटन करतील. Narendra Modi today on Pune tour
पुण्यात बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दुपारी पावणेदोन वाजता पंतप्रधानांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ होईल.
या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण म्हणजे मालगुडी गावावर आधारित छोटेखानी प्रतिकृती (मॉडेल) आहे; जी ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून जिवंत केली जाणार आहे. व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेली व्यंगचित्रे संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यानंतर दुपारी 1.45 वाजता पंतप्रधानांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App