विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ एक महिला समुद्रात पडली. यानंतर प्रसंगावधान राखत एका फोटोग्राफरनं तात्काळ समुद्रात उडी घेतली. त्याने तत्परता दाखवत महिलेचा जीव वाचवला आहे. त्याबाबतचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. Photographer Rescued a Woman Who Fell into the Sea
गेट वे ऑफ इंडिया येथील सुरक्षा भितींवर बसलेल्या एका महिलेचा तोल गेला. ती समुद्रात पडली. यानंतर याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरनं लगेचच समुद्रात उडी मारली आणि या महिलेचा जीव वाचवला. ही घटना सोमवारी घडली असून घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
फोटोग्राफरच्या या धाडसाचं आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यानं केलेल्या या मदतीचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की या व्यक्तीनं महिलेलेला वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली आहे. पर्यटकांनी त्यांना वरती खेचण्यासाठी पाण्यात दोर टाकला. याच्याच मदतीनं महिलेला वर काढलं. महिला २० फूट खोल पाण्यात कोसळल्यानं बचावकार्यासाठी बराच वेळ लागला. मात्र, घटनेत तिचा जीव वाचला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App